1 / 6
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम अनेकांच्या पसंतीस पडलेला कार्यक्रम आहे. 'चला हवा येऊ द्या' ही सद्दी मोडीत काढत महाराष्ट्राची हास्यजत्राने मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र या शोमुळे अनेकदा वादही निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये अभिनेता समीर चौघुले याने तारपा नृत्य विनोदी पद्धतीने सादर केले होते. यामुळे आदिवासी समाज संतापला होता. यानंतर समीर चौघुले याने आदिवासी समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.
ओंकार भोजने हा या कार्यक्रमातील आघाडीचा कलाकार होता. ओंकारने हा शो अचानक सोडून दिला होता. त्याने फू बाई फू हा दुसरा विनोदी कार्यक्रम स्वीकारत त्याच्या चाहत्यांना धक्का दिला होता. दुर्दैवाने हा कार्यक्रम अवघे काही भाग चालला आणि नंतर बंद पडला. ओंकारने हास्यजत्रा कार्यक्रम का सोडला याचे कारण अद्याप कळालेले नाही.
विशाखा सुभेदार हिने देखील हास्यजत्रा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय जाहीर करत प्रेक्षकांना धक्का दिला होता. कार्यक्रम सोडण्यामागील कारणांच्या अफवा पसरवू नका अशी विनंती विशाखा हिने केली होती. हा कार्यक्रम सोडल्यानंतर विशाखा ही शुभ विवाह मालिकेमध्ये दिसली.

































































