गॅस कनेक्शन बदलायचे असेल तर…

जर एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी राहायला गेल्यानंतर गॅस कनेक्शन बदलण्यासाठी काय कराल.

सर्वात आधी तुम्हाला सध्याच्या गॅस एजन्सीमध्ये जा आणि गॅस कनेक्शन हस्तांतरणासाठी सांगा.

पत्ता, ओळखीचा पुरावा आणि गॅस कनेक्शनचे कागदपत्रे गॅस एजन्सीला सादर करावे लागतील.

एजन्सी एक ट्रान्सफर व्हाऊचर देईल. ते नवीन एजन्सीला द्या. सोबत नव्या कनेक्शनसाठी अर्ज भरा.

यासाठी थोडेफार शुल्क भरावे लागू शकते. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर नवीन कनेक्शन घ्यावे लागेल.