
हायवेवरून जात असताना कधी कधी दोनदा, तर कधी कधी प्रवासाविना ई-चलान कापले जात असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी असतात.
तुमच्या बाबतीत जर असे घडले. तुमच्या वाहनाचे चुकून ई-चलान कापले गेले असेल तर जास्त चिंता करण्याची गरज नाही.
सर्वात आधी ई-चलानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवर तक्रार किंवा ग्रेव्हिअन्सचा ऑप्शन शोधून त्यावर क्लिक करा.
ई-चलानमध्ये काय समस्या येतेय ते पाहा. आवश्यक वाटल्यास पुरावे जोडा. तुमचा अर्ज दाखल करा. जर ई-चलान चुकीचे वाटले तर तक्रार करा.
तक्रार करण्यासाठी तुम्ही कायदेशीर सल्लागार किंवा वाहतूक पोलिसांशी संपर्क साधू शकता. वेळेत तक्रार दाखल करणे महत्त्वाचे आहे.