
नितळ स्वच्छ डोळे
- काकडीच्या गोल चकत्या अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. नंतर या थंड झालेल्या चकत्या डोळ्यांवर 20 मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.
- डोळे बंद करून गुलाबपाण्यात भिजलेले कापसाचे बोळे डोळ्यावर ठेवा. 15 मिनिटांनी साध्या पाण्याने डोळे धुऊन घ्या. गुलाब पाण्यामुळे त्वचा स्वच्छ होते. त्वचेचे आरोग्य सुधारते.
- थंड दुधामध्ये कापसाचे बोळे भिजत ठेवा. हे बोळे डोळ्यांच्या खाली जवळपास 15 मिनिटे ठेवा. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा. काही दिवसांनी काळी वर्तुळे दूर होतील.
- कापसाच्या बोळ्याने लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली काळ्या डागांवर लावा. 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. सकाळी आणि रात्री असे दिवसातून 2 वेळा हा उपाय करू शकता.
- ताज्या कोरफडीच्या गराने डोळ्यांखाली हळूहळू मालीश करा. 10ते15 मिनिटे तसेच राहू द्या. 10 मिनिटांनी कापसाच्या मदतीने स्वच्छ पुसून घ्या. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि पोषण देण्यासाठी कोरफडीचा गर पोषक आहे.
- ग्रीन टी बॅगेत असलेल्या गुणांमुळे डोळे रिफ्रेश होतात. शिवाय काळी वर्तुळेही कमी होतात. ग्रीन टी बॅग पाण्यात बुडवा. 30 मिनिटे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर थंड टी बॅग आपल्या डोळ्यांवर ठेवा. 15 मिनिटांनी साध्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. हा उपाय दिवसातून एकदा करा.





























































