नितळ चेहऱ्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नितळ चेहऱ्यासाठी

  • चेहऱ्यावरील मुरुमे, चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. ही माती तेलकट त्वचा किंवा कोरड्या दोन्ही प्रकारच्या त्वचेवर वापरू शकतो.
  • लिंबाच्या रसात मुलतानी माती एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावून वीस मिनिटे तसाच ठेवा, वाळल्यावर चेहरा धुवा. तेलकट त्वचेवर मुलतानी मातीचा सर्वात जास्त फायदा होतो.
  • चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि कोमल करण्यासाठी बदाम फेस पॅक, दूध आणि मुलतानी माती एकत्र करून वापरा आणि वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. कोरड्या त्वचेसाठी या फेस पॅकचा फायदा होतो.
  • ज्यांना चेहऱ्यावर डाग आणि मुरुमांचा त्रास आहे, त्यांनी मुलतानी माती, लिंबू आणि गुलाबजल एकत्र करून फेस पॅक बनवा.
  • पुदिन्याची पेस्ट, मुलतानी माती आणि दही एकत्र करून लावल्याने डाग, मुरुमे दूर होण्यास मदत होते.
  • चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी काकडीचा रस, दही, टोमॅटोचा गर आणि मुलतानी माती एकत्र करून 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा.
  • चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी दही, अंडे आणि एक चमचा मुलतानी माती मिक्स करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ करा.
  • अर्धा चमचा चंदन पावडर, दोन चमचे मुलतानी माती आणि चिमूटभर हळद घ्यायची. त्वचा तेलकट असेल तर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा पाणी एकत्र करा आणि जर त्वचा कोरडी असेल तर त्यामध्ये दूध एकत्र करून लेप बनवा. चेहऱ्यावर मुरुमांचे डाग दूर करण्यासाठी चंदन फायदेशीर आहे.
  • चेहऱ्यावर तजेलदार दिसण्यासाठी गुलाबजल, मुलतानी माती आणि मध एकत्र करून यांची पेस्ट चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासाने चेहरा धुवावा.
  • सावळ्या त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईल, मुलतानी माती आणि गाजरचा कीस एकत्र करून त्याची पेस्ट तयार करायची. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासाने चेहरा धुवावा.