सोपे नियम

42

>> टीप्स

  • रोज एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होत नाही आणि पचनक्रिया चांगली होते. त्यामुळे हृदयविकारांचा त्रास होणार नाही.
  • दिवसभर संपूर्ण फुप्फुसे भरून श्वास घ्या. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल आणि फुप्फुसे निरोगी राहतील.
  • रोज सकाळी सात ते नऊ या वेळेत सकाळचा न्याहारी करावी. त्यामुळे मेंदू सतत कार्यरत राहतो आणि त्यामुळे उत्साह टिकून राहील.
  • जेवणानंतर लगेच आंघोळ करू नये. तसेच कुठलेही मेहनतीचे काम करू नये. तज्ञांच्या मते जेवल्यानंतर आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते. त्यामुळे पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो.
  • नियमित किमान अर्धा तास कोवळ्या उन्हात उभे रहा. त्याने ड जीवनसत्त्वाची कमतरता भासणार नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासोबत वेदना, ब्लॉक दूर होतील.
  • जेवल्या जेवल्या पाणी न पिता जेवणाच्या चाळीस मिनिटांनंतर पाणी प्यावे. त्याने पचनक्रिया चांगली होते.
  • जेवण नेहमी वेळेवर जेवायला हवे. जेवणात एकाच प्रकारचे पदार्थ घ्या. अनेक पदार्थ घेऊ नका.
  • कुठलेही काम करताना ताठ बसण्याची सवय लावा. त्यामुळे पाठदुखीचा त्रास होणार नाही.
  • रोज आठ ते नऊ तासांची झोप अवश्य घ्या. बेडरूममध्ये हवा यावी म्हणून योग्य व्हेंटिलेशन असू द्या.
आपली प्रतिक्रिया द्या