टीप्स : प्रसन्न वातावरणासाठी…

163

प्रसन्न वातावरणासाठी…

  • दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर आणि लवंग अवश्य जाळावी. आरती करुन त्यानंतर कापूर जाळून आरती घ्यावी. त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होऊन घरातील वास्तुदोष नष्ट होतील.
  • आठवड्यातून एकदा कोणत्याही दिवशी शेणाच्या गोवऱ्या जाळून गुग्गुळची धुरी दिल्याने गृहकलह शांत होतो. गुगळ सुगंधित असण्यासोबतच डोक्याच्या आजारांमध्ये लाभदायक ठरते.
  • धूप शेणाच्या गोवरीवर किंवा विस्तवावर ठेवून जाळला जातो तेव्हा घर प्रसन्न वाटते. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही धूप फायदेशीर आहे. शारीरीक थकवा नाहीसा होतो, तणाव जाणवत नाही.
  • अगरु, तगर, कुष्ठ, शैलज, शर्करा, नागरमोथा, चंदन, वेलदोडा, तमालपत्र, मुशीर, कापूर, गुग्गुळ, नखला, मोगरी, दालचिनी हे वेगवेगळे धूप घरात लावले तर घरात आकस्मिक अपघात घडत नाहीत.
आपली प्रतिक्रिया द्या