टीप्स : स्मार्ट लूक

केस

तरुण वयातच केस गळत असतील तर त्यामागे ताण, पोषक तत्त्वांची कमतरता, औषधांचे दुष्परिणाम ही  कारणे असू शकतात. प्रथिनांनी समाविष्ट असलेला पौष्टिक आहार घ्या. भरपूर पाणी प्या आणि ताणतणावापासून दूर राहा.

त्वचा

त्वचेला सुरकुत्या पडणं हे वय वाढण्याच्या लक्षणांबरोबर ऑस्टिओपोरोसिस या आजाराचे लक्षण मानले जाते. चेहऱ्यावर लाल रंगाचे क्रण त्वचेच्या विकारामुळे उठतात. त्वचा कोरडी पडणे हे थायरॉइड किंवा किडनी समस्यांचे संकेत असू शकतात. भरपूर पाणी प्या, ध्यानधारणा करा. श्वासोच्छ्वासावर आधारित व्यायाम करा.

ओठ

ओठ कोरडे पडणे किंवा फुटणे हे सर्दी, कणकण यांचे लक्षण असू शकते. तसेच डिहायड्रेशन होण्याचेही चिन्ह असू शकते. हलके आणि ताजे अन्न खा. बाहेर खाणे टाळा. लोहयुक्त आणि पौष्टिक आहाराचे सेवन करा.

नखे

पांढरी नखे ऑनिमियाचे लक्षण असू शकते. निळ्या रंगाची नखे हृदयाचे आजार आणि तुटणारी नखे थायरॉईडची समस्या असल्याचे दर्शवतात. आयर्न आणि कॅल्शियमने परिपूर्ण अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. श्वासावर आधारित व्यायाम करा.

दात

दात पडणे हे ऑस्टिओपोरोसिसचे कारण असू शकते. ते किडनीच्या आजाराचे कारण आहे. कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डीयुक्त पदार्थ खा. भरपूर पाणी प्या, रक्तदाब ताब्यात ठेवा.

डोळे

थायरॉईड, किडनीची समस्या, अन्नाची ऍलर्जी यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. आहारात कडधान्ये, पालेभाज्यांचा समावेश करा. योग्य वेळी विश्रांती घ्या, व्यायाम करा.