
उन्हाळ्यात सर्वच जण उकाडय़ामुळे हैराण होतात. पण प्रत्येकाला एसी-कुलरसारखी उपकरणे खरेदी करणे शक्य होत नाही. तर हे सोपे उपाय करून पहा.
खोली थंड करण्यासोबत आपले शरीर आतून नैसर्गिकरित्या थंड राहील याची काळजीदेखील घ्या. भरपूर पाणी प्या, थंड पाण्याने अंघोळ करा, सैल कपडे वापरा.
शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्णता अधिक जाणवते. त्यामुळे काकडी, कलिंगड, टरबूज यांसारखी पाण्याने भरलेली फळे खा. शक्य असल्यास दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळा.



























































