सोपे उपाय- अनलॉकमध्येही सावध राहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • बाहेरून घरी आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवा.
  • नियमित घरच्या घरी आयुर्वेदिक काढा घ्यायला हवा.
  • प्रवास करताना सॅनिटायझर, मास्क याचा वापर करणे योग्य.
  • बरे वाटत नसल्यास घरातून बाहेर पडू नये, घरातच स्वतःला विलग करून घेणे.
  • ऑफिसमध्ये पूर्णवेळ मास्क वापरणे. तेथे साबण, सॅनिटायझर सोबत ठेवावे.
  • संध्याकाळी भूक लागत असल्याने सुका खाऊ बॅगेत ठेवल्यास बाहेर खाण्याची गरज लागणार नाही. त्यासोबत एखादं फळही ठेवावं.
  • रोजच्या रोज ऑफिस निर्जंतुक केले आहे की नाही याची शहानिशा करावी.
  • प्रवास करताना खोकताना, शिंकताना आवश्यक काळजी घ्यावी.
  • कार्यालयातील डेस्क, टेबल, कीबोर्ड, टेलिफोन सॅनिटाइझ करावे.
  • कर्मचाऱ्य़ांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे, जेणेकरून एखादी व्यक्ती
  • कोरोनाबाधित असल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांपर्यंत पोहोचता येणे सोपे जाते.