असं झालं तर…विनाकागदपत्रे ‘आधार’वरील पत्ता करा अपडेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aadhar card

1 –आधार कार्डवरील पत्ता अपडेट करणे आवश्यक असते. मात्र कागदपत्रांअभावी अनेकांना पत्ता बदलता येत नाही. यासाठी एक सुविधा पुरवण्यात आली आहे.

2 – स्वतःच्या नावावर पत्त्याचा पुरावा नसतो. वीज बिल किंवा भाडेकरार हे आई किंवा वडिलांच्या नावावर असतात. पुटुंबप्रमुखाच्या आधारद्वारे अशा लोकांना पत्ता अपडेट करता येतो.

3 – मायआधार पोर्टलवर ‘हेड ऑफ फॅमिली बेस्ड अॅड्रेस अपडेट’ हा पर्याय निवडावा. तुमच्या पुटुंबप्रमुखाशी असलेले नाते सिद्ध करणारे कागदपत्र अपलोड करावे.

4 – दुसरा पर्याय म्हणजे फॉर्मवर तुमचा नवा पत्ता आणि पह्टो लावावा. तुमच्या भागातील खासदार, आमदार, नगरसेवक किंवा राजपत्रित अधिकाऱयांकडून साक्षांकित करावा.

5 – साक्षांकित केलेला हा फॉर्म आधार पोर्टलवर पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येतो. तो अपलोड केल्यानंतर दोन आठवडय़ांमध्ये पत्ता अपडेट होतो.