हिवाळय़ात काय खाल? वाचा सविस्तर…

1881

गूळ

हिवाळ्यात गूळ खाणे केव्हाही चांगले. कारण मुळात गूळ हा उष्ण प्रकृतीचा पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसांत ते खाल्ल्यास सर्दी-पडशाची समस्या दूर होते. गुळामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे आखडलेल्या स्नायूंपासून आराम मिळतो आणि शरीरातील वेदनाही कमी होतात.

शेंगदाणे

भुईमुगाचे शेंगदाणे थंडीच्या दिवसांत वरदानच. कारण 100 ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यांमध्ये 1 लिटर दुधाएवढे प्रथिने असतात. शेंगदाण्यांमुळे पचनशक्ती वाढते. दूध, तूप आणि बदाम यांचे फायदे एकटय़ा शेंगदाण्यांमधून मिळतात. त्यामुळे शरीराला खनिजे, भरपूर जीवनसत्त्वे तर मिळतातच,

खजूर

हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. दररोज सकाळी गरम दुधासोबत खजूर खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. दोन-तीन खजूर, थोडी काळीमिरी आणि थोडी वेलची पावडर घेऊन हे मिश्रण पाण्यात उकळा. ते मिश्रण रात्री झोपण्याआधी प्यावे.

पपई

थंडीच्या दिवसांमध्ये पपईचा आरोग्याला फायदाच होतो. या दिवसांत पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारून भूक चांगली लागते. 1 चमचा पपईचा रस, 1 चमचा मध आणि 4 चमचे गरम पाणी मिसळून ते मिश्रण प्यावे. त्यानंतर थोडय़ा वेळाने 2 चमचे एरंडेल तेल प्यावे. असे दोन ते तीन दिवस केल्यास आतडय़ांमधील कृमी नष्ट होतात.

सफरचंद

केवळ हिवाळ्यातच नव्हे तर सफरचंदाचे औषधी उपयोग कधीही घेता येतात. लठ्ठपणासंबधित आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्त्वे फायदेशीर ठरतात. त्यामुळे या थंडीच्या दिवसांत नियमित रोज एक तरी सफरचंद खावे. सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यातील फायबर पचनशक्ती वाढवतो, तर सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजल टाकून चेहऱयावर चोळल्यावर सावळा रंग उजळतो.

आपली प्रतिक्रिया द्या