
दूर्वांकुरम् समर्पयामि!
- उन्हात फिरल्याने किंवा जास्त उन्हाळ्यामुळे बऱयाचदा नाकातून रक्त वाहू लागते. त्याला घोळणा फुटणे असे म्हणतात. त्यासाठी घरगुती उपाय म्हणून दूर्वांचा रस काढावा. त्याचे चार-पाच थेंब नाकात टाकावेत. त्याने थोडा आराम मिळेल.
- अंगातील उष्णता वाढल्याने तोंड येते किंवा तोंडात लालसर फोड येतात. हा त्रास ज्यांना होत असेल त्यांनी उपाय म्हणून दूर्वांचा रस पाण्यात मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. तीस सेकंद गुळणा करून पाणी थुंकून टाकावे.
- डोकेदुखीचा त्रास असल्यास दूर्वा वाटून त्यात थोडा चुना मिसळून त्याचा लेप डोक्यावर लावावा. काही वेळ तसाच लेप ठेवून नंतर थंड पाण्याने तो धुऊन टाकावा. डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
- डोळे जळजळत असल्यास दूर्वा वाटून त्याची पेस्ट करा. डोळे बंद करून ती पेस्ट डोळ्यांवर ठेवावी. त्यावर कापूस ठेवावा. थंडावा मिळतो.
- दूर्वांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’चे भरपूर प्रमाण असते. त्याच्या सेवनाने डोळ्यांची नजर वाढते. त्याचबरोबर अनवाणी पायाने दूर्वांवर चालल्यास डोळ्यांना फायदा होतो.
- दूर्वांचा रस सकाळ, संध्याकाळ सेवन केल्यास किडनी स्टोन बरा होण्यास मदत होते.





























































