
रात्री झोपताना केस मोकळे ठेवता?
- बऱ्याच जणींची अशी अपेक्षा असते की, सकाळी उठल्यावर केस मऊ आणि रेशमी असावेत. यासाठी रात्री झोपण्याअगोदर केसांना चांगला हेअरमास्क लावा. नंतर कॅप घाला आणि सकाळी उठल्यावर केस धुवा. केस नेहमीपेक्षा जास्त मऊ होतील.
- ज्यांना कुरळ्या केसांची आवड आहे त्यांनी रात्री केस बांधून झोपावे. केस आणि केसातील कुरळेपणा सकाळी उठल्यावरदेखील चांगल्या अवस्थेत राहतील. याकरिता केसांचा आंबाडा किंवा पोनीटेल बांधून झोपावे.
- रात्रीच्या वेळी केस कोरडे आणि नाजूक बनतात, कारण डोक्याखाली घेतलेली उशी, केसातील ओलावा यामुळे तेल शोषून घेतले जाते. सकाळी कंगवा करताना केस नाजूक झाल्यामुळे तुटतात. त्यामुळे रात्री झोपताना केस बांधून झोपणे किंवा स्कार्फ बांधून झोपणे आवश्यक आहे.
- केस सुंदर राहण्यासाठी उशीला सिल्कचे अभ्रे, सुती अभ्रे वापरा. कॉटन पिलो कव्हर वापरल्यामुळे केस कोरडे होऊन तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या सुरक्षेसाठी रेशमी अभ्रे वापरू शकता. यामुळे केस तुटण्याचा आणि गुंता होण्याचा धोका कमी असतो.
- ओले केस बांधून कधीही झोपू नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता वाढते.
- केसांच्या प्रकारानुसार त्यांची योग्य काळजी घ्यायला हवी. अगदी छोटे केस असतील तर ते रात्री झोपताना बांधून ठेवण्याची गरज नाही. परंतु लांब केस असतील ते मोकळे सोडून झोपणे योग्य नाही.
- केस कुरळे असतील तर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला सैल बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही.
- केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनी बांधून ठेऊ शकता. यामुळे केसांमध्ये गुंता होणार नाही.
- केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. मात्र जास्त वेळ व घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटू शकतात.
























































