हे करून पहा -दिवा जास्त वेळ तेवत ठेवण्यासाठी…

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. घरात आणि दारात दिवा तेवत ठेवायला हवा. दिवा जास्त वेळ तेवत ठेवायचा असेल तर त्यासाठी काही उपाय आहेत. सर्वात आधी मातीचा दिवा असेल तर तो लावण्यापूर्वी काही तास पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे दिवा जास्त वेळ तेल शोषून घेत नाही. दिव्यासोबत कापसाची वातसुद्धा तेलात भिजवून ठेवा. त्यामुळे ती लवकर जळणार नाही.

दिव्यासाठी योग्य आकाराची आणि जाडसर वात वापरा. बारीक वात लवकर जळून जाते. दिव्यामध्ये तेल पुरेसे भरा जेणेकरून वात तेल शोषून घेऊ शकेल. दिवा लावताना वातावरण शांत आणि हवेशीर असावे. जर तो जास्त हवेच्या किंवा वाऱयाच्या ठिकाणी असेल तर तो लवकर विझू शकतो, हे लक्षात ठेवा.