असं झालं तर…बंद झालेली एसआयपी सुरू करायचीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंद झालेली एसआयपी पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन एसआयपी अर्ज भरावा लागतो किंवा संबंधित प्लॅटफॉर्मवरून ती पुन्हा ऑक्टिव्ह करावी लागते.

बँकेत अपुऱया शिल्लक रकमेमुळे किंवा सलग तीन हप्ते न गेल्यामुळे एसआयपी बंद झाली असेल तर तुमचे गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात, पण पुढील नवीन गुंतवणूक थांबते.

तुम्ही ज्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मवरून (Groww, Zerodha Coin, ET Money) किंवा थेट म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरून एसआयपी करत आहात, तिथे लॉगिन करा.

इनएक्टिव्ह एसआयपी शोधण्यासाठी तुमच्या डॅशबोर्डवरील ‘SIP’ किंवा ‘Order Book’ मध्ये जाऊन बंद किंवा रद्द झालेल्या एसआयपीचा पर्याय तपासा.

बऱयाच ठिकाणी बंद झालेली एसआयपी पुन्हा सुरू करण्यासाठी (Restart) वर क्लिक करा. पर्याय नसेल, तर पुन्हा त्याच योजनेत नवीन एसआयपी मँडेट सेट करावे लागेल.