ट्रक आहे की वेडिंग हॉल? कलादिग्दर्शकाची अनोखी शक्कल

202

लग्नसराई म्हटलं की सर्वात आधी शोधाशोध सुरू होते ती हॉलची. कोरोनाच्या संकटात आता हॉल मिळणेही मुश्किल झाले आहे. परंतु अवघ्या 25 हजारांत लग्नाचा हॉलच तुमच्या दारात उभा राहिला तर? तिरुपूर जिह्याच्या उडुमलपेटमध्ये राहणारे कला दिग्दर्शक अब्दुल हकीम यांनी ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. लोकांची अडचण लक्षात घेता त्यांनी आपल्या ट्रकचे मोबाईल केडिंग हॉलमध्ये रुपांतर केले आहे. लग्नाची ऑर्डर मिळाली की हा ट्रक इच्छित स्थळी पोहोचतो. तेथे पोहोचल्यावर कारागीर 2 तासांत ट्रकच्या सजाकटीचे काम पूर्ण करतात.

मोबाईल वेडिंग हॉलसाठी ते 25 हजार रुपये आकारतात. याशिवाय कॅटरिंगसाठी वेगळे पॅकेज आहे. सध्या हकीम उडुमलपेटच्या आसपास 50 ते 100 कि.मी.च्या परिसरातच सेवा देत आहेत.

चार महिन्यांचे बुकिंग फुल्ल!

स्टेजवर चढण्या-उतरण्यासाठी पायऱया, मल्टी लाईट सिस्टीम, कार्पेट आणि साउंड सिस्टीमही या मोबाईल केडिंग हॉलमध्ये लावली आहे. पाहुण्यांना स्टेजवर चढण्याआधी सॅनिटायझर आणि मास्क दिले जातात. आतापर्यंत या मोबाईल वेडिंग हॉलवर दोन लग्नं पार पडली असून पुढील चार महिन्यांसाठी बुकिंगही फुल्ल झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या