स्लिम ट्रिम दिसण्यासाठी मॉडेल घेत होती गोळ्या, अखेर झाली अशी अवस्था

स्लीम ट्रीम दिसण्यासाठी तरुणी वाटेल ते करायला तयार होतात मात्र काहीवेळेला ते जीवघेणेही ठरु शकते. अशीच एक घटना समोर आली आहे. युक्रेनच्या मॉ़डेलने स्लीमट्रीम दिसण्यासाठी डाएट पिल्स घेतल्या आणि तिला चांगलेच महागात पडले. या गोळ्यांमुळे तिला रुग्णालयात भरती व्हावे लागले.

हेलन हाइन असे त्या मॉडेलचे नाव आहे. द सनच्या वृत्तानुसार, चरबी कमी करणाऱ्या गोळ्यांमध्ये असलेल्या डीएनपी घटकामुळे असे झाले. वजन कमी करणाऱ्या या गोळ्या हेलेनने युक्रेनमधून 2017 साली खरेदी केले होते. या मॉडेलचे सध्या वय 40 वर्ष आहे आणि ती आपले वजन 50 ते 60 च्या मध्ये ठेवण्यासाठी या गोळ्या घेत होती.

वृत्तानुसार, या गोळ्या सुरु केल्यानंतर हेलेनची तब्येत बिघडली आणि एवढी बिघडली की या गोळ्या घेणे तिच्या जिवावत बेतू शकत होते. हेलेन एक इव्हेंट ऑर्गनायझर आहे आणि तिने 20व्या वर्षापासून फॅट बर्न करणाऱ्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती. मॉडेलने सांगितले की, 2006 मध्ये ती जिमला न चुकता जायची आणि त्या दरम्यान तिने बाकी सदस्यांप्रमाणे जिम मेंबर्सकडून त्या गोळ्या खरेदी केल्या. हेलेनने त्यावर जवळपास 120 युरो खर्च केले मात्र सहा आठवड्यानंतर तिला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिची तब्येत बिघडायला सुरुवात झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. जिथे तिचे हार्ट रेट 280 बीट्स वर पोहोचला होता. हा सामान्य रेट पेक्षा चार पटिने अधिक होता आणि त्यामुळे हेलेन मृत्यूच्या दारातून परतली आहे.

मॉडेलने सांगितले की, रुग्णालयातून घरी पोहोचल्यावर तिला कायम थकवा जाणवायचा. 2012 मध्ये तिचा थकवा एवढा वाढला की, रात्री त्रासून ती रडत बसायची. दरम्यान हेलेनला कळले की, तिला त्या गोळ्यांची सवय लागली आहे आणि तिने पुन्हा त्या डाएट पिल्स घ्यायला सुरुवात केली. मात्र हळूहळू तिने या गोळ्यांची सवय मोडली. मॉडेल पुढे सांगते आता मी आनंदी जीवन जगत आहे. मी त्या गोळ्या सोडून माझे आयुष्य वाचवले आणि आता मी हेल्दी खाणं आणि व्यायम यावर लक्षकेंद्रित केले आहे.