टोकियो ऑलिम्पिक तळय़ात मळय़ात!

501

कोरोना व्हायरसचा फटका क्रीडाविश्वाला बसला आहे. काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे जुलै-ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जपानमधील जनतेने क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाला विरोध दर्शवला असतानाच आयोजक समिती मात्र आताच काही सांगू शकत नाही असे म्हणते आहे. एकूणच काय टोकियो ऑलिम्पिकचे तळ्यात मळ्यात सुरू आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आयओसीचा निर्णय अंतिम
टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळेप्रमाणे होईल की नाही तसेच ही क्रीडा शर्यत पुढे ढकलण्यात येईल याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) याबाबत अंतिम निर्णय घेईल. आम्ही मात्र आयोजनासाठी सज्ज आहोत, असे मत आयोजक समितीचे उपाध्यक्ष तोशियाकी इंडो यांनी शनिवारी व्यक्त केले.

क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्याची मागणी
संपूर्ण जगानेच कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. त्यामुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत होणारी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी यासाठी काही देशांनी आयोजकांसमोर याबाबतची मागणी केली आहे. यामध्ये कोलंबिया, स्लोवेनिया, नॉर्वे या देशांचा समावेश आहे.

कोरोना इफेक्ट
z श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्थानिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या स्पर्धांबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.
z चीनचा फुटबॉलपटू वू लेई आणि स्कॉटलंडचा नागरिक असलेला क्रिकेटपटू माजिद हक या दोघांनाही कोरोनाची लागण झाली असून दोघांवरची उपचार सुरू आहेत.
z इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने तेथील क्रिकेट मोसम 28 मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये यंदाच्या मोसमाला सात आठवडे उशिरा सुरुवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या