
टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केलेल्या हिंदुस्थानच्या अमित पांघल याला रशियात सुरू असलेल्या गव्हर्नर्स कप बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. उपांत्य लढतीत त्याला ऑलिम्पिक चॅम्पियन शखोबिदीन जोइरोव याच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत हिंदुस्थानला पदक जिंकून देणारा अमित पांघल हा एकमेव खेळाडू होय.
सध्या जागतिक क्रमवारीत अक्वल स्थानावर असलेल्या अमित पांघलला उपांत्य लढतीत उझबेकिस्तानच्या शाखोबिदीन जोइरोवने 5-0 गुणफरकाने हरविले. याच जोइरोवने 2019च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत अमित पांघलवर विजय मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. हे दोघेही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सोनेरी यश मिळविण्यासाठी अमित पांघलला अजून मेहनत घेण्याची गरज आहे.
या स्पर्धेसाठी रशियाच्या दौऱयावर अमित पांघलसह विनोद तंवर (49 किलो), मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो), वरिंदर सिंह (60 किलो), मनीष काwशिक (63 किलो), आशीष कुमार (75 किलो), सुमित सांगवान (81 किलो) व नमन तंवर (91 किलो) हे हिंदुस्थानी बॉक्सर गेले होते. मात्र, अमित पांघल वगळता इतर सर्वजण सलामीलाच गारद झाले. यात मनीष काwशिक व आशिष कुमार या ऑलिम्पिक कोटा मिळवणाऱया खेळाडूंची सलामीलाच हार म्हणजे त्यांच्या ऑलिम्पिक तयारीला धक्काच म्हणावा लागेल.


























































