टोकियो ऑलिम्पिक होणारच! संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगावर असलेले कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. जपानमध्येही कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. पण सध्या असलेल्या प्रतिकूल परिस्थितीनंतरही टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येईल, असे स्पष्ट मत संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

जपानमध्ये कोरोनाची आणखी एक लाट आली आहे. यामुळे बहुतांशी विभागात लॉकडाऊनची आपत्ती ओढवली आहे. याच पार्श्वभूमीवर संयोजन समितीचे पदाधिकारी व जपानमधील शासन यांच्यामध्ये बैठक झाली. याबाबत योशिरो मोरी म्हणाले, टोकियो ऑलिम्पिक होणारच असे आम्ही ठरवले आहे. ऑलिम्पिकचे नवे रूप पाहायला मिळू शकते.