टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांना परवानगी?

कोरोनामुळे गेल्या वर्षी (2020) आयोजित करण्यात येणारे टोकियो ऑलिम्पिक आता या वर्षी (2021) जुलै ते ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. पण या ऑलिम्पिकमधील क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडाप्रेमी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात येणार की नाही, याबाबत अद्याप प्रश्नचिन्हच आहे. याबाबतचा अंतिम निर्णय फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेण्यात येईल अशी माहिती टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांच्याकडून मंगळवारी देण्यात आली.

योशिरो मोरी पुढे म्हणाले, आता टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात येऊ शकत नाही. तसेच रद्दही करण्यात येणार नाही. आयोजन समिती हे करायला तयार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या