बायकोचे नाव वेश्या म्हणून वेबसाईटवर टाकले, प्रसिद्ध फुटबॉलपटूला तुरुंगवासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, प्राग

झेक रिपब्लिकचा प्रसिद्ध फुटबॉलपटू थॉमस रेपका याला तिथल्या स्थानिक न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्याविरूद्ध त्याची पूर्वाश्रमीची बायको व्लादा एरबोवा हिने तक्रार नोंदवली होती. एस्कॉर्ट बेवसाईटवर म्हणजेच वेश्यांशी संपर्क साधण्यासाठीच्या वेबसाईटवर थॉमसने व्लादाचं नाव अपलोड केलं होतं. हे नाव अलपोड झाल्यानंतर तिला शय्यासोबतीसाठी असंख्य फोन यायला लागले. यानंतर जेव्हा तिने जेव्हा चौकशी केली तेव्हा तिला कळालं की तिचं नाव एस्कॉर्ट साईटवर कोणीतरी अपलोड करण्यात आलं आहे.

जेव्हा व्लादाने पोलिसांत तक्रार केली तेव्हा तिचं नाव थॉमसनेच अपलोड केल्याचं स्पष्ट झालं. बर्नो इथे थॉमसविरोधात खटला दाखल करण्यात आला. न्यायाधीशांनी थॉमसला दोषी ठरवत त्याला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. थॉमससोबत त्याच्यी सध्याची प्रेयसी आणि टीव्हीवर वृत्तनिवेदिका कॅटरिना क्रिस्टेलोव्हा हिला देखील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र तिला तुरुंगवासाची शिक्षा न देता तिच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. कॅटरिनाने व्लादाचं नाव वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी थॉमसला मदत केली होती.