
आपण दररोज घरात वापरल्या जाणार्या छोट्या छोट्या गोष्टींकडे अधिक लक्ष देत नाही. यामध्येच आपण दररोज वापरत असलेल्या ‘टूथपेस्ट’चा देखील समावेश होतो. आपण वापरत असलेल्या टूथपेस्ट ट्यूबच्या खालील भागात नेहमी आपल्याला काळ्या, निळ्या, हिरव्या किंवा लाल रंगाच्या पट्ट्या दिसतात. मात्र या रंगांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
आपण वापरत असलेल्या टूथपेस्टचे रंग त्यामध्ये उपस्थित रासायनिक पदार्थ दर्शवितात. या रंगांवरून तुमचा टूथपेस्ट आरोग्यासाठी हानिकारक आहे की नाही, याची माहिती तुम्ही मिळू शकता. रंगानुसार टूथपेस्टची रासायनिक रचना खालीलप्रमाणे दर्शवितात –
1. काळी पट्टी – अशी पट्टी असलेल्या टूथपेस्ट मध्ये फक्त रासायनिक घटक असतात. सहसा असे टूथपेस्ट वापराने टाळावे.
2. निळी पट्टी – यामध्ये नैसर्गिक आणि औषधी घटक असतात.
3. लाल पट्टी – यामध्ये नैसर्गिक आणि रासायनिक घटकांचे मिश्रण असते .
4 हिरवी पट्टी – यामध्ये सर्व नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.





























































