
खार जिमखाना येथे मंगळवार 15 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीमध्ये रेगन अल्बुकर्क आणि श्वेता पार्टे नायक यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात, अर्णव क्षीरसागर आणि युवराज यादव अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱया रँकिंगवर आहेत. ठाणे जिह्याच्या अनुष्का पाटील हिला 19 वर्षांखालील मुलींच्या गटात स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे.
क्रमवारी पुढीलप्रमाणे – महिला ः 1. श्वेता पार्टे-नायक (मुंबई शहर), 2.संपदा भिवंडकर (टीएसटीटीए).
पुरुष – 1) रेगन अल्बुकर्क (टीएसटीटीए), 2) शौनक शिंदे (पुणे).