मालवण समुद्रकिनारी आढळला मृत समुद्रीकासव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

देवबाग समुद्रकिनारी सोमवारी सायंकाळी मोठा समुद्री कासव मृतावस्थेत आढळला. कासवाचे पाठीवरील कवच फुटले होते. मोठ्या बोटीच्या पंख्यात अडकून किंवा जहाजाच्या धक्क्याने कासवाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पर्यटन व्यावसाईक तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज खोबरेकर, देवबाग ग्रामस्थ व पर्यटक यांनी समुद्रकिनारी कासवाचे दफन केले.