
गेल्या 25 वर्षांपासून बेघर, वंचित व निराधार मुलांना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणाऱ्या ‘टच’ संस्थेने कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात दिला आहे. लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच गेल्या दीड वर्षापासून ज्या लोकांना रोजगार नाही किंवा ज्या लोकांना उदरनिर्वाहासाठी अडचण येत आहे अशा कुटुंबांसाठी मदतकार्य हाती घेतले आहे. गेल्या वर्षी संस्थेने 1082 कुटुंबांना 5400 किलो तांदूळ, 2250 किलो डाळ, मीठ इतके अन्नधान्य पुरविण्याचे कार्य केले, याशिवाय हायजिन किट व मास्कचे वाटप केले. ‘टच’ने यावर्षी गरजू व हातावर पोट असलेल्या कुटुंबांची परिस्थिती वाईट असल्याचे लक्षात आल्यावर मुंबईच्या डबेवाल्यांमार्फत अन्नधान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये असे लक्षात आले आहे की, अजूनही बरीचशी कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे टच संस्थेने मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन समाजातील दानशूर व्यक्तीना केले आहे. संपर्क – प्रकल्प समन्वयक योगेश सरोदे – 9819453873 / 8766825485.

























































