ओडिशात पर्यटकांच्या बसला अपघात; 5 ठार, 40 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील नयागढ जिह्यात एका पर्यटकाच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. हा अपघात नयागढ जिह्यातील दसपल्लाजवळील हनुमान घाटीत झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची मोठय़ा दगडाला धडक दिली. बस पलटी झाल्याने प्रवाशांचा मृत्यू झाला. बस चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाटी गॅस कटरचा वापर करण्यात आला. जखमी प्रवाशांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.