
सामना ऑनलाईन, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीमध्ये कर्नाटक एमटा कोळसा खाण होती जी आता बंद पडली आहे. या खाणीतील मशीन काढून नेण्याचं काम शुक्रवारपासून सुरू झालं.याला विरोध करण्यासाठी दोन तरुणांनी टॉवरवर चढून निषेध आंदोलन केलं.
देशातील कोळसा घोटाळा उघड झाल्यानंतर ही खाण बंद पडली आहे. खाण बंद पडल्याने इथे नोकरी मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांचा रोजगार बुडाला. रोजगार आणि बुडालेले वेतनाचे पैसे आधी द्या नाहीतर इथली मशीन हलवू देणार नाही असा पवित्रा इथल्या प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. यामुळेच हे प्रकल्पग्रस्त सकाळी सात वाजल्यापासून टॉवरवर चढून बसले आहेत.

























































