टोयाटोची अफलातून कामगिरी, निर्मिती प्रक्रियेतून प्लॅस्टिक केले हद्दपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
plastic

प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी टोयाटा-किर्लोस्कर मोटर्सने पुढाकार घेतला आहे. निर्मिती प्रक्रियेतून प्लॅस्टिक पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱया प्लॅस्टिकऐवजी पेपर आणि कॉटन बॅगचा वापर कंपनी करणार आहे. याशिवाय कर्नाटकमधील बिदाडी प्रकल्पात 96 टक्के पुर्नप्रक्रियेचे लक्ष्यदेखील कंपनीने ठेवले आहे.

प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण ही जगापुढे डोकेदुखी ठरत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वचजण आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. टोयोटा कंपनीनेदेखील ‘टोयोटा इन्वायरमेंट चॅलेंज 2050’ या उपक्रमाअंतर्गत प्लॅस्टिकमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाबाबत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशिमुरा म्हणाले, देशभरातून एकदाच वापरण्याजोग्या येणाऱया प्लॅस्टिकवर बंदी घालण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्याला अनुसरूनच आम्ही हे पाऊल उचलले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कंपनीतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात.