टीप्स : हृदयविकार टाळता येईल

प्रातिनिधीक फोटो

हृदयविकाराचा झटका कधी येईल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. पण ज्येष्ठ नागरिकांनी जरा दक्ष राहिलं तर हृदयविकार टाळता येऊ शकतो. हा अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणे हमखास दिसतात. पण आपण दुर्लक्ष करतो… 

  • सतत थकवा जाणवत असेल तर तो वय वाढल्यामुळे नाही, तर हृदयविकार येण्याचे प्रमुख लक्षण आहे. बहुतांश महिलांमध्ये हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याआधी पाहायला मिळाले आहे. अगदी लहान काम केल्यानेदेखील थकवा येतो. जसे की साधे अंथरूण नीट केल्यावरही आपण खूप थकतो किंवा अगदी अंघोळ केल्यावरदेखील उगीचच थकवा जाणवतो.
  • पोटदुखी तसं पाहिलं तर सर्वसामान्य गोष्ट… पण जर तुम्हाला नेहमी पोटदुखी, सुजणे, पोट खराब होणे या समस्या भेडसावत असतील तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. कारण त्यामुळे पुढच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. हे लक्षण महिला आणि पुरुष दोघांमध्ये सारख्याच प्रमाणात दिसते.
  • श्वास घेण्यात सतत अडचण येत असेल तरीही नंतर हृदयविकार येऊ शकतो. जर सतत चक्कर येते आणि श्वास घेताना त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार करून घ्या.
  • रात्रीच्या वेळी झोप यायलाच हवी. ती येत नसेल तर ही अनिद्रादेखील हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता खूप पटीने वाढवतो. हे लक्षणही महिलांमध्ये जास्त दिसून येते.
  • केस गळणे ही गोष्ट साधी दिसत असली तरी हृदयरोगाची मोठी जोखीम मानली जाते. यामुळे हृदयविकार येऊ शकतो. हे लक्षण साधारणपणे 50 टंक्क्यापेक्षा जास्त पुरुषांत दिसते, पण काही महिलांमध्येदेखील ते दिसते.
  • थोड्या थोड्या काळाने छातीमध्ये वेदना होत असतील तर तो हृदयविकार नसला तरी त्याचे ते लक्षण असते हे लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांना बरेचदा वेगवेगळ्या तीव्रतेने छाती दुखते. पण हे लक्षण पुरुषांमध्ये दिसले तर त्याचा परिणाम कधीतरी हृदयविकारावर होऊ शकतो. केवळ 30 टक्के महिलांमध्ये हे लक्षण दिसते.
आपली प्रतिक्रिया द्या