
तुम्ही लिफ्ट दे कारण तुमचा चांगुलपणा तुम्हालाच महागात पडू शकतो.
कारण, एखाद्याला लिफ्ट देणं म्हणजे बेकायदा वाहतूक ठरून तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
लिफ्ट दिल्यामुळे ऐरोली येथील नितीन नायर यांना दीड हजारांचा दंड पडला आहे. १८ जून रोजी पावसामुळे अडकलेल्या तीन जणांना नायर यांनी आपल्या गाडीतून लिफ्ट दिली. मात्र, त्यांची गाडी वाहतूक पोलीस असलेल्या अजित पाटील यांनी अडवली. मोटार अधिनियम कायदा अंतर्गत टी- परमिटशिवाय खासगी वाहनातून प्रवासी प्रवास करू शकत नाही असे अजित पाटील यांनी सांगितले. टी परमिट हे प्रवासी वाहतूक करणाऱ्याच चालकांना दिले जाते. प्रवाशांना घेऊन टी-परमिटशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. ज्यानुसार १,५०० रुपयाचा दंड नितीन नायर यांना बजावण्यात आला.
या घटनेबद्दल नायर यांनी फेसबुकवर एक पोस्टवर लिहिले, ” मी एक सामान्य माणूस आहे. मला कोणत्याही वादात पडायचे नाहीये. मी फक्त त्यांना मदत करावी म्हणून त्यांना लिफ्ट दिली. पण, मला मोटार अधिनियम कायदा माहीत नसल्यामुळे अडचणीत आलो.” कायदेतज्ज्ञांनीही या कायद्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून जर असे नियम असतील, तर नागरिक दुसऱ्याला मदत करण्यापूर्वी विचार करतील. त्यामुळे असे नियम कालबाह्य असून त्यांच्यात बदल होणं गरजेचं आहे, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.



























































