
नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक रायगडात दाखल झाले आहेत. अलिबागमध्येही पर्यटकांनी येण्यास सुरुवात केली असून कार्लेखिंड ते अलिबाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सुमारे आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक सुरळीत करताना पोलिसांवर ताण पडत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने रायगडलायेतात. 31 डिसेंबर मंगळवारी असल्याने शनिवारपासूनच पर्यटकांनी रायगडमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. अलिबागमध्येही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. पर्यटकांची गर्दी वाढल्याने वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अलिबागकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. वाहन चालक बेशिस्तपणे नियम न पाळता वाहन चालवत असून दुहेरी, तिहेरी रांगा लावल्याने वाहतूक कोंडीचा त्रास पर्यटकांनाही होत आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक पोलिसांवरही ताण पडत आहे.

























































