
सामना ऑनलाईन । लोणावळा
मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात अमृतांजन पुलानजीक टँकरमधून ऑईल गळती झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ पहाटे ४ च्या सुमारास टँकरमधून ऑईल सांडल्याने मुंबई गोवा महामार्गावर ऑइल पसरले होते. यामुळे वाहने घसरून कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
ऑइल पडलेल्या ठिकाणी माती टाकण्यात आली आहे. तसंच पावसाने ऑईल निघाले आहे. वाहतूक काही प्रमाणात सुरळीत सुरू झाली असली तरी खबरदारीसाठी अवजड वाहनांची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत.



























































