
बस थांब्यावर बिनधास्तपणे अनधिकृत गाड्या उभ्या करून बस व प्रवाशांना नाहक अडथळा करणाऱया वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. 15 दिवस विशेष मोहीम राबवीत अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बस थांब्यांवर बेकायदेशीरपणे गाड्या पार्क करणाऱया वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी 23 फेब्रुवारी ते 8 मार्च या दरम्यान विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमे अंतर्गत तब्बल 26 हजार 462 ई-चलानची कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत 10 लाख 51 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.






























































