
दिल्लीत 10 नोव्हेंबरला झालेल्या स्पह्टामुळे बॉलीवूडला धक्का बसला आहे. देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या स्पह्टाचा परिणाम बॉलीवूडवरही झालेला दिसत आहे. अभिनेता रणवीर सिंह याचा आगामी चित्रपट ‘धुरंधर’चा ट्रेलर लाँच इव्हेंट पुढे ढकलला आहे. हा इव्हेंट बुधवारी मुंबईत पार पडणार होता. नव्या तारखेची लवकरच घोषणा केली जाणार आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंह याने दिल्लीतील नियोजित शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

























































