स्वप्नांच्या ताण्याबाण्याचा शोध घेणाऱ्या ‘सुई-धागा’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आपण सर्व जण स्वप्नं बघतो. काही जण ते पूर्ण करण्यासाठी जगतात. तर काहींना स्वप्न बघणं म्हणजे काय हेच मुळात माहीत नसतं. अशाच शून्य स्थितीतून स्वप्नपूर्तीचा शोध म्हणजे सुई धागा हा चित्रपट. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मौजी आणि ममता या जोडप्याची ही कथा आहे. आजोबांचा टेलरिंगचा व्यवसाय ठप्प झाला म्हणून पडेल ते काम करणारा मौजी. मेहनती असलेली त्याची बायको ममता. मालकाच्या एका खासगी कार्यक्रमात नवऱ्याचा होत असलेला अपमान पाहून ती त्याला स्वतःचा व्यवसाय करण्याचं प्रोत्साहन देते, असं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. वरुण धवन आणि अनुष्का शर्मा अभिनित हा चित्रपट मनिष शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर-