शौर्य हाच मराठ्याचा धर्म आहे! पाहा पानिपतचा दमदार ट्रेलर

1479

मराठ्यांच्या इतिहासातली एक महत्त्वाची लढाई म्हणजे 1761 मध्ये झालेलं पानिपतचं तिसरं युद्ध. हिंदुस्थानच्या युद्धइतिहासातल्या अतिशय भयंकर युद्धांपैकी एक असलेल्या या युद्धात मराठी मुलखाने अनेक वीर योद्धे गमावले. या युद्धाचा पुनर्प्रत्यय देणारा पानिपत चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलरमध्ये सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर दिसत आहे. तर पार्वतीबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन दिसत आहे. अहमदशहा अब्दालीची भूमिका संजय दत्त साकारणार आहे. चित्रपटाचे संवाद आणि चित्रीकरण पाहता चित्रपट अपेक्षेपेक्षा भव्य दिव्य असेल, असा अंदाज प्रेक्षकांनी वर्तवला आहे. पानिपतचं युद्ध आणि मराठ्यांचा पराक्रम सांगणारा हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या