ट्रेलची ‘आझाद हो आझाद रहो’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाईफस्टाईल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेलने स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘आझाद हो आझाद रहो’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आपल्या युझर्सपर्यंत त्यांना बांधून ठेवणाऱ्या कोणत्याही शृंखलेतून मुक्त होण्याचा आणि आझाद होण्याचा संदेश देण्यात आला आहे. यानिमित्ताने ट्रेलने एक स्वातंत्र्य गीत लाँच केले आहे, जे ‘आझाद हो आझाद रहो’ ही सदिच्छा ठळकपणे आणि अभिमानाने व्यक्त करते. या व्हिडिओमध्ये ईपीआर अय्यर आणि जी.जे. स्टॉर्म हे कलाकार झळकत आहेत. नकारात्मक विचारांच्या आणि सामाजिक साचांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसत आहेत.