1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ, तूर्त लोकलचे तिकीट आणि पास जैसे थे

रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार आहे. नॉन-एसी मेल, एक्स्प्रेस गाडय़ांच्या भाडय़ामध्ये प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ होणार आहे, तर एसी क्लासच्या तिकिटामध्ये प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ करण्यात येणार आहे. द्वितीय श्रेणीसाठी 500 किमीपेक्षा जास्त अंतराकरिता प्रति किमी 0.50 पैशांची भाडेवाढ लागू होणार आहे. या निर्णयाची 1 जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. तूर्तास उपनगरीय रेल्वेचे तिकीट व मासिक पासच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.