
विजय जोशी, नांदेड
पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांपैकी 6 जवान हे नांदेडजवळच्या मुदखेड इथल्या CRPF प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले होते अशी माहिती या प्रशिक्षण केंद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी दिली आहे. जीवाला चटका लावणारी बाब ही आहे की अवघ्या 10 दिवसांपूर्वी हे सहा जवान प्रशिक्षण घेऊन जम्मू कश्मीर येथे रवाना झाले होते. या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडलेले आणि या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे खालील प्रमाणे आहेत.
- जी.सुब्रमण्यम (82 बटालिअन),तमिळनाडू
- गुरु एच (82 बटालिअन),कर्नाटक
- हेमराज मीणा (61 बटालिअन),कोटा
- प्रसन्न साहू (61 बटालिअन),ओडीशा
- रतन कुमार ठाकूर (ग्रुप सेंटर,काठगोदाम),बिहार
- अश्विनी काओची (35 बटालिअन),मध्य प्रदेश





























































