गद्दारांच्या पाच हजार कोटींच्या घोटाळय़ाची आज पोलखोल; रोहित पवार यांचा इशारा

महाराष्ट्रातील ‘गँग्ज ऑफ गद्दार’चा आज पर्दाफाश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पाच हजार कोटींच्या घोटाळय़ाची माहिती देणार आहेत. भारतमातेशी गद्दारी करून इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या वारसदारांच्या घशात हे पाच हजार कोटी घातले गेले आहेत.

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर ही माहिती दिली. ‘वर्तमानातील गद्दारांची इतिहासातल्या गद्दारांशी हातमिळवणी’ असे म्हणत त्यांनी घोटाळय़ाचा गंभीर आरोप केला आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात सकाळी साडेनऊ वाजता प्रसारमाध्यमांसमोर हा घोटाळा उघडकीस आणला जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा या घोटाळय़ात हात असल्याचे बोलले जात आहे.