यूपीआयवरून एका दिवसात 70 कोटी व्यवहार

हिंदुस्थानात डिजिटल पेमेंटची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. 2 ऑगस्ट 2025 या एका दिवसात यूपीआयवरून तब्बल 70.7 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची नोंद झाली आहे. एनपीसीआयने ही आकडेवारी शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांत यूपीआयवरून करण्यात येणारा व्यवहार वाढला आहे. 2023 मध्ये दैनंदिन व्यवहार 35 कोटी होता. 2024 मध्ये 50 कोटी झाला आणि आता तो 70 कोटींवर पोहोचला आहे. 2026 पर्यंत हा व्यवहार 100 कोटींपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.