
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातल्या पाच सनदी अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे दुग्धविकास आयुक्त आर. आर. जाधव यांची कामगार आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर दुग्धविकास आयुक्त म्हणून एन. के. पोयाम यांची नियुक्ती झाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपसचिव प्रदीप चंद्रन यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त (अमरावती) म्हणून नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त आदिवासी आयुक्त डी. बी. गावडे यांची महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाचे (नाशिक) व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अभिमन्यू काळे यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.























































