मुंबईत अंगावर झाड कोसळून ४ जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील दादर परिसरात अंगावर झाड कोसळून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दादरमधील शिवसेना भवन परिसरात स्वामी समर्थ मठाजवळ सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी एका तरुणीला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे. श्रेया राऊत (२०) असं गंभीर जखमी झालेल्या तरूणीचं नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.