माथेरानमध्ये 70 फूट दरीत ट्रेकर्स कोसळला

माथेरान येथील पेब किल्ल्यावर सर करण्यासाठी गेलेला ट्रेकर्स पाय घसरून 70 फूट खोल दरीत कोसळून जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. विशाल चव्हाण असे या ट्रेकर्सचे नाव असून तो त्याचा भाऊ मनोज चव्हाण, मित्र अभय गोरिवले, विजय गोरिवले आणि एका सहा वर्षीय मुलासोबत ट्रेकिंगला गेला होता. अखेर बचाव दलाच्या मदतीने त्याला आठ तार्सच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले.

अंबरनाथमधील लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या विशालने भाऊ आणि मित्रांसोबत पेब किल्ला अर्थात विकटगड येथे ट्रेकिंगला जाण्याचे नियोजन केले. शनिवारी सकाळी त्यांनी नेरळ फणसवाडीमार्गे पेब किल्ला चढण्यास सुरुवात केली. परंतु पायवाट चुकल्याने विशालने साथीदारांना एकाच ठिकाणी थांबवले व पुढील वाट शोधण्यासाठी उभा डोंगर चढून पुढे गेला. दरम्यान पावसामुळे निसरड्या झालेल्या पायवाटेवरून पाय घसरून तो थेट दरीत कोसळला. सुदैवाने जंगलातील एका झाडावर अडकल्याने तो बचावला. त्याने भाऊ मनोजला मोबाईलवरून माहिती दिली. त्यानंतर भावाने माथेरान सह्याद्री आपत्कालीन सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने विशालला सखरूप बाहेर काढण्यात यश आले