ट्रेंड कशासाठी… वासरासाठी

राजस्थानमध्ये एका बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला केला आणि त्याला आपले शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात वासराच्या आईने मोठे धाडस दाखवत बिबट्याला घाबरवून तिथून पळवून लावले. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आईच्या प्रेमाची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही, याचेच दर्शन या व्हिडीओतून घडतेय. आपल्या वासराला वाचवण्यासाठी गाय थेट मृत्यूशी भिडली. वासराच्या मानेला जबडय़ात पकडून बिबटय़ा ओढून झुडपात जाणार तेवढ्यात वासराची आई बिबट्याच्या दिशेने पळत जाते. जे पाहून बिबट्या तेथून धूम ठोकून पळून जातो.

राजस्थानच्या बाली, पाळी येथे सफारीवर गेलेल्या काही लोकांनी टिपलेला असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सुमारे 1.25 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले असून प्रेक्षक त्या गायीच्या शौर्यावर भारावून गेले आहेत.