ट्रेंड – कुत्र्याचे भारतभ्रमण

पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणारे लोक लाखो आहेत, पण बिहारच्या सोनूची सर कुणालाही येणार नाही. दत्तक घेतलेल्या एका कुत्र्याला घेऊन सोनू सध्या भारतभ्रमण करतो आहे. चार्ली असे त्याच्या कुत्र्याचे नाव आहे. चार्लीला घेऊन सोनू देशभर फिरतो आहे. या दोघांनी मिळून 12,000 किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. रामेश्वरम, केदारनाथ आणि बद्रीनाथ सारख्या प्रतिष्ठत स्थळांना त्यांनी भेट दिली आहे आणि आता ते प्रयागराजच्या मार्गावर आहेत. सोनूने इन्स्टाग्रामवरील @safarmeinrahi या हँडलखाली त्यांच्या प्रवासाचे डॉक्युमेंटेशन करत आहे. याच हँडलवर त्याने अलीकडेच त्यांच्या हृदयस्पर्शी प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा सोनू आणि त्याच्या चार्लीची सध्या देशभरात चर्चा आहे. प्राणीप्रेमी सोनूचे भरभरून कौतुक करत आहेत.