
गणेशोत्सवात घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होते. मुंबई आणि आसपासच्या उपनगर आणि परिसरात बाप्पाच्या पूजेसाठी भटजी मिळणे कठीण होऊन बसते. या समस्येवर एका भाविकाने नामी शक्कल लढवली आहे. या पट्ठयाने गणपतीच्या पूजेसाठी चक्क चॅट जीटीपीचा आधार घेतला आहे. हा तरुण आपला मोबाईल सुरु करून चॅट जीपीटीला गणेश पूजा कशी करायची याची विनंती करतो.
चॅट जीपीटी त्या तरुणाला मराठी भाषेमध्ये आचमन करायला लावतो. चॅट जीटीपी ज्या प्रकारे मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे हा तरुण तसे करतोय. या व्हिडिओवर एकाने कमेंट केलीय कि, ‘पूजा पूर्ण करण्यासाठी पटकन रिचार्ज करा अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ@ its tk creates या इंस्टा आयडीवरून शेयर करण्यात आला आहे.
























































