
इयत्ता बारावीमध्ये नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. लाडक्या लेकाRच्या यशाचे सर्वत्र काैतुक करण्यात येत आहे. अशाच एका कुटुंबातील काहीसा वेगळा काैतुक सोहळा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कुटुंबाने पेढे न वाटता वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा केला. पुटुंबातील लाडकी लेक सुमारे 90 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्य हातात एका कागदावर तिला मिळालेले गुण मोठ्य़ा अक्षरात लिहिलेले दिसतात. लेकीची एन्ट्री होताच तिच्यासोबत प्रत्येक सदस्य आनंदाने डान्स करतो. मोबाईलच्या कॅमेऱ्याजवळ येत तिला प्रत्येक विषयात मिळालेले गुण दाखवतो. शेवटी तिला सर्व जण लाडू भरवतात. हे पुटुंब अतिशय गोड आहे, अशा शब्दांमध्ये नेटकऱयांनी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.



























































